रंगाचा सण होळी
रंगाचा सण होळी
1 min
266
होळी रे होळी
पुरणाची पोळी
करू अनिष्टांचा नाश
होळीपुढे सुंदर रांगोळी।।१।।
आला रंगाचा सण होळी
राग द्वेष नष्ट करूया
रंगात रंगुनी सारे
मतभेद जातीभेद विसरू या।।२।
शिशिर ऋतूला
देऊ या निरोप आनंदाने
नवीन हिरव्या पालवीचे
करू स्वागत वसंताचे।।३।।
रंगात रंग मिसळता
होतो तयार एकच रंग
भरता पिचकारीत तो
बालगोपाळ नाचे ओलेचिंब।।४।।
रंगात रंगुनी असा सण
साजरा करू या होळीचा
स्नेहभाव, एकजूटीने
स्वाद पुरणपोळीचा।।५।।
