रंगाचा जादूगार
रंगाचा जादूगार
असो इंद्रधनू की घनकाळे
मोर सुंदर की मोर पिसारे
त्याच्या हातातल्या कुंचल्याने रंगवी तो हे जग सारे
रंगाची किमया असे की किमया कलेची
उभी राहे निसर्पुग पुढ्यात कागदावरही
असो नजारे चांदण्यांचे की वनतील वृक्षराजी
हसते बाळ जणू त्याच्या कुंचल्यातुन
उभा राहे कृष्ण सावळा संम्मुख राधेच्या तो
चाले जणू कृष्णलिला प्रत्यक्ष ती नजरेच्या
अथांग तो समुद्र की असे निर्झर फेसाळता
क्षण भर देई भास अंगावर तुशारांचा
रंग त्याचे सोबती ,कुंचले शस्त्र ते
जादुकरी जादुगार रंगानी करी काय किमया