रंग
रंग
1 min
213
इंद्रधनूचे रंग आले मम अंगणी
अंगणातील मुलांना खाली भेटायला
इंद्रधनूच्या या सप्त रंगावरती
मुले लागली झुलायला, डुलायला...
रंग तांबडा फुलांच्या राजा गुलाबाचा
रंग नारंगी गोड आंबट गोड संत्र्याचा
पिवळी धमक हळद फार गुणकारी
हिरवा रंग मनमोहक अजब सृष्टीचा.....
निळ्या आभाळी चमचमते चांदणी
पारवा रंगाचा पारवा येतो मम अंगणी
जांभळा रंग वांग अन् जांभळाचा
हसायला लागले सारे रंग नील नभांगणी.....
