रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
रंगी बेरंगी हे आयुष्य माझे
मी आनंदी अन हसरी
मी सुंदर रंग होळीचे
मी कृष्णाची बासरी
मी साजिरी मी गोजिरी
जन्म माझा आगळा
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा ||
रंग मातृत्वाचा हृदयी मम्
मी आकाशी पक्षिणीसम
लक्ष मम् आकाश जरी
दुर्ष्टी माझी पिलांवरी
मी कणखर, मी खंबीर
जन्म माझा आगळा
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा ||
रंग लाल शौर्याचा मी
मी पराक्रमी, मी धोरणी
संसार जरी जीवन माझे
मी मुसद्दी, मी राजकारणी
जग बदलण्याची हिम्मत माझी
जन्म माझा आगळा
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा ||
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा ||
