रंग खेळूया
रंग खेळूया
1 min
194
रंग खेळूया गं चला
सयांनो रंग खेळूया ||धृ||
होळीचा हा रंग नभामध्ये
उंचच उंच उधळुया
रंग खेळूया गं चला
सयांनो रंग खेळूया ||१||
नको पाण्याचा अपव्यय
करू सप्तरंगांची बरसात
निसर्गाचे रक्षण करताना
खेळू नाचू देऊ एकमेकां साथ
जमू रंग खेळाया
गुलाल सारा उधळूया
सयांनो रंग खेळूया ||२||
एक रंग सखी तुझा
आता हा घेते माझा
मिळूनी एकोप्याने खेळू
नका वागु दोन दूजा
झाडे लावू सारेजण
वृक्षसंवर्धनासाठी मिळूया
सयानो रंग खेळूया ||३||
