रंग होळीचा
रंग होळीचा
1 min
390
सप्तरंगात चिंब भिजून
तनमन डोलू लागले
स्पर्श साजणाचा झाला
शामरंगात मी नहाले.....
आनंदाने आज माखले
होळीच्या या ग रंगात
मन बावरले सखे
विविध रंगी ढंगात.....
धुंदी भिरभिरे नयनावर
आगळी नशा चढली
रंगाने या होळीच्या
ह्रदयी तार छेडिली....
देहभान विसरले आज
रंगात एकमेकांना रंगवताना
राधा तर झाली कान्हाची
साज रंगाचे चढवताना.....
रंग लावले तनामनाला
उधळण केली रंगांची
आवेग दाटला श्वासात
रंगत चढली खेळाची....
उत्साह वाढला खेळताना
सजणीच्या प्रेमात सजणा रंगला
मोरपिसी पिसारा तनूवरी
जादूई रंगांनी खूपच खुलला.....
