रम्य पावसाळा !!
रम्य पावसाळा !!
1 min
269
गंध भरल्या मातीचा ,
तो सुगंध वेड लावे !
चिंब भिजल्या धरेचे ,
हे रूप मनास भावे !
बेधुंद कोसळणारा ,
पाऊस गाई गाणे !
इंद्रधनुच्या रंगामध्ये ,
रूप धरणीचे खुले ¡
धरणीच्या या भेटीला
गर्जत कडाडत आला !
बेधुंद ,मदमस्त बरसल्या ,
मिलनोत्सुक या पाऊसधारा !
आवरेना धरतीलाही ,
आवेग त्या वर्षावाचा !
कण अन् कण मोहोरला
हिरवा साज बहरला !
तृप्त जाहली ,
तप्त ही धरणी !
लेवून अंगभर ,
पावसाच्या सरी !!
