रम्य बालपण
रम्य बालपण
आठवती मजला आजही ते सोनेरी क्षण
भावंडांच्या खेळ खोड्यांनी गजबजून जायचे अंगण
कधी एकदा संपतील परीक्षा ह्याची असायची आतुरता
मे महिन्याच्या सुट्टीची असायची नेहमीच उत्सुकता
सख्खे, चुलत, आतेभावंडांचा जमायचा नेहमी अड्डा
लुटुपुटुच्या लढाई आणि भांडणाने जागा व्हायचा वाडा
लपंडावाची गंमत चाले मागच्या आमराईत
परसातल्या त्या बागेत धुडघुस घाली आम्हा वानरांची वरात
अंगणातल्या त्या चिंचं, बोरं, आंब्यांचा आजही आठवतोय तो स्वाद
एकत्र बसून खाण्याचा घेतला आम्ही भरपूर आस्वाद
दिवसभर रंगे पकडा पकडी आणि साप शिडीचा खेळ
जेवणाचे आणि झोपण्याचे बसायचेच नाही कधी ताळ मेळ
झोपाळ्यावर रंगायची गप्पां गोष्टींची मैफल
आजीने केलेल्या कैरी पन्हाचा वेगळाच असायचा फील
मी लहान असताना computer, मोबाईलचं फॅड नव्हतं
म्हणूनच त्यावेळी नातं सर्वांचं एकमेकांशी घट्ट होतं