रमले अंतरी
रमले अंतरी
रमले अंतरी माझ्या गावच्या भेटीत,
आंबे, काजू, फणस, नारळ मधाचे शेत
करवंद, तोरन, जांभळे भेट खात वाटेत
कधी घरोघरी घटते दुधाचे फुटत
फूल-फळांचा सुवास अंतरी दरवळत
घाट वळणाची अवघड ओढती मनात
पशु-पक्ष्यांची गाणी पहाट सुरेख ऐकत
भेटे चांदणे मोहरे ओल्या लोचनात
सागराच्या किनारी माझे घरकुल
सोनेरी पहाट भेटे किरणांची मनोहर
उंबरठ्याच्या भेटी असे स्वर्गही आतुर
अबोली, पारिजातक, सुरंगीची वाटसर
रमले अंतरी सासर माहेर जोडीत
हाडे खिळखिळी, श्वास सुखाचा घेत
शुद्ध हवा, जिव्हाळा नसानसात पेरत
एकत्र कुटुंब होत सारी नांदती सुखात
आजोबा, बाबांच्या आठवणींची शिदोरी
चिमटा पोटास घेत, नाही शेत विकत
नंदनवन फुलवी देह चंदनापरी झिजत
आप्तस्वकीय आता टपली नाग होत
