रक्षाबंधन 🌺
रक्षाबंधन 🌺
भावा बहिणींच्या नात्यात हेवे, दावे नसावे.
फक्त त्यात जीवापाड निखळ प्रेम असावे.2
लहानपणी सारखी भांडण,दोस्ती वेळोवेळी असावी.
मोठेपणीही मानापमान हवेतच उडवावे.
तेवढ्यासाठी नाते मुळीच नाही तोडावे.
राग आला भावाला , त्याचे मनोगट घट्ट धरावे.
नेऊन त्याला घरी,पाटावरती बसवावे.2
ओवाळणीचे ताट अखंड दिव्याने सजवावे.
गाठ सैल झालेली घट्ट अजून करावी.
मोती दान फिके पडे, लागेल त्यात प्रेम दिसू.
ओवाळणीत पडतील भावाच्या आनंदाचे आसू.
बहिणीला भावाने पोटाशी घ्यावे,
सैल झालेल्या नात्याला घट्ट गाठीने बांधावे.2
त्याच्या खिशात दोन आसू पश्चातापाचे टाकावे.
मायेचे झरे नितांत पाझरावे.
मौसमी वाऱ्या संगें आपणही झुलावे.
श्रावणाच्या पावसात मनसोक्त नाचावे.
अतुट नात्यांचे रक्षाबंधन आयुष्यभर जपावे.
बंधन हे काळजाचे, भाऊबीजेच्या वाटेवर न्यावे.
दिवाळीचे दिवे दोघांच्याही घरी उत्साहाने डोलावे.2
