रक्षाबंधन
रक्षाबंधन
प्रेमळ आणि निरागस बंध प्रेमाचा,
असे सुंदर तो धागा रेशमी बंधाचा.
दोन नात्यांचे बंध भावा-बहिणीचे,
पविञ नाते गोड असे ते विश्वाचे.
जीवनातील नाते आपले हे दोघांचे,
जसे हे रेशीम गाठी कृष्ण- द्रोपदीचे.
सुंदर निखळ नाते दोघांना शोभते,
आहे ते मायाळू जन्मांतरीचे नाते.
पाठीशी उभा राहणारा तो पाठीराखा,
आयुष्यभर असतो बहिणीचा सखा.
ज्ञानेश्वराची बहिण ती माऊली मुक्ताई,
शोभे परी ती विठ्ठलाची असे जनाई.
फुलांप्रमाणे दरवळत असतात हे गंध,
देव ही जोडतो हे भावा-बहिणीचे बंध.
राखी असते ही प्रेमळ दिवसाची गाठ,
जोडली जाते आयुष्याची रेशीमगाठ.