रक्षाबंधन
रक्षाबंधन
भावाला हवी बहीण बहीणीला हवा भाऊ
दोघांची जमलेली असते गट्टी लूटूपुटीची मस्ती, क्षणभर कट्टी
उत्साहाने येतो सण रक्षाबंधन भाऊराया तुला सतत वंदन
औक्षणाचे सजविले ताट राखीचा तो वेगळाच थाट
मोठी राखी हवी म्हणून भाऊ बसला रुसून आई बघते त्याच्याकडे गोड हसून
बाबा समजवतात अरे वेड्या राखी छोटी मोठी असे काही नाही धागा तिचा असावा पक्का, प्रेम वाढत जाई
त्यालाही ते पटले, बसला राखी बांधायला पाटावर सजवली राखी मनगटावर
हक्काची ओवाळणी पडली ताटात साजरा झाला सण थाटात
राखी म्हणजे प्रेमभाव, विश्वासाचं नातं आपोआप विणला जाणारा रेशमी धागा बहीणीसाठी भाऊ निरंतर जागा ॥
