रक्षाबंधन
रक्षाबंधन


रक्षाबंधन येते दरवर्षी साजरी होते ती आगळी वेगळी
पाटाभोवती काढली जाते सुबक अशी रांगोळी
ओवाळणीचे ताट सजवले जाते फुल पाकळ्यांनी
दिव्याची वात पेटते तुपाच्या धारेनी
ताट सजते हळदी-कुंकवाच्या करंड्यानी
रंगेबेरंगी मण्याच्या राख्यानी
गोड अशा मिठाईच्या तुकड्यांनी
शुभ असा लावला जातो टिळा माथी
प्रेमाची आणि रक्षणाची बांधली जाते राखी
औक्षण केलं जातं सजलेल्या ताटानी
मिठाईचा तुकडा आणतो नात्यात गोडवा आणि
भेटवस्तू होते देवाणघेवाण
असा रक्षाबंधनाचा सण साजरा होतो छान