रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
160
अरे भाऊराया तूला कसली असते रे घाई
आज जरा निवांत बस बाकी मला काही माहित नाही
रोज रोज कुठे अरे मी तूझ्या घरी येते
रक्षाबंधनाच्या ओढीने तेवढी धावत पळत येते
महिनोनमहीने या सणाची वाट पाहत असते
येता जाता रोजच सारखेदिवस मोजत बसते
सण आहे हा बहीण भावाच्या नात्याचा
त्यांच्यातल्या हळव्या प्रेमाचा अन मायेचा
नको असतं अरे मला काही घेणं देण
हवं असतं जातांना फक्त माहेरपणाचं लेन
तेवढंच कोडकौतुक सासरी मिरवता येत
आठवण म्हणून तेच आयुष्यभर जपल जात
पण नको मला इतर काही हवीय फक्त माया
सावली म्हणून हवीय फक्त तुझ्या प्रेमाची छाया
