STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
482

लहानपणापासूनच भाऊ 

माझ्या हृदयाचे स्पंदन 

प्रेम, माया, आपुलकी, ममतेचे 

बहीण भावात आहे वेगळे बंधन 


सुखी ठेव भावाला माझ्या 

म्हणून देवाला मी करते वंदन 

विश्वास, निस्वार्थ भावना यांचे 

मनावर गोंदले मी गोंदण 


भाऊ माझा सदा करतो 

माझे मनापासून रक्षण 

राखी पौर्णिमेच्या दिवशी 

प्रेमाने करते त्याचे अक्षवन 


माझ्या भावाच्या हातावर 

बांधते मी स्नेहाने राखी

टळावे जीवनातून संकटे त्याच्या 

येवढीच अपेक्षा आहे बाकी 


अहंकार आणि भेदभाव याला 

नाही आमच्या जीवनात थारा 

माझ्या सुख दुःखात आहे 

माझ्या भावाचं सहारा 


माझ्या भावाच्या पाठीवर आहे 

माझ्या आपुल्कीचे थाप 

कधी कधी भाऊच समजदार 

पनांनी बनतो माझा बाप 


रेशमी धाग्याने बांधलेल्या राखीणी 

बहीण भावात वेगळाच बनतो बंध

रक्षाबंधनच्या दिवशी सगळीकडे 

पसरते राखी पौर्णिमेच्या परंपरेंचे गंध 


बहिणीने भावाकडे कधीच 

काही ना मागावे 

पण भावानेही बहिण काहीच 

न मागता तिला सार काही द्यावे 


भावाच्या डोक्यावर असते 

बहिणीच्या आशीर्वादाचे हात 

बहिण भावाचे जीवनभर असेच 

रहावे निस्वार्थ भावनेने साथ 


Rate this content
Log in