STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

रखुमाईची पैंजण ...

रखुमाईची पैंजण ...

1 min
127

रखुमाईची गं पैंजण वाजते रुणझूण ,

भक्त आहे विठूरायाच्या भक्तीत तल्लीन ...

डोईवर धरले गं तुळशीचे वृदांवन ,

हाती त्यांचे मृंदग काळ्या सावलीत मन ...

संत तुका माझा गाती विठूनामाचा गजर ,

दृष्ट काढा रखुमाईच्या रुपाची घेऊन लिंबलोन ...

सावळी माती पंढरपूरची गं धन्य धन्य गाई ,

वारीला गं सावळ्याच्या मेघांची मधू वाजे बिन ...

दुमदुमली पंढरी पाहून उत्साहाचा अंगी संचार,

टाळ विणा वाजे गाई भक्त पांडूरंगाचे भजन ...

विठूरायांवर रुसली रुक्मिणी मायाळू ,

प्रेमात विठ्ठल म्हणे नको जाऊ मला सोडून ...

विठ्ठलांची श्रद्धा माझ्या चंद्रभागेपरी निर्मळ ,

पुंडलीकाच्या भक्तीला मान विटेवर उभे राहून ...

रखुमाईची गं पैंजण वाजते रुणझूण ,

भक्त आहे विठूरायाच्या भक्तीत तल्लीन ...


Rate this content
Log in