STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

रिमोटचा अपमान...

रिमोटचा अपमान...

1 min
488

आज सहजच माझा मूड लागला

म्हणून "गेट "च नवं पुस्तक उघडलं

नव्या पुस्तकाला माझं

पहिलं दर्शन घडलं....


नशीबवान म्हणायचं हे माझं

नवीन करकरित पुस्तक

गेले तीनचार दिवस घरी आल्यावर

वाट पहात होत टेबलावर....


तिकडून टी व्ही बडबडत होता

हिरमूसल्या नजरेने पहात होता

शेजारच्या रिमोटला खुणावत होता

मधूनच आवाज वाढवून लक्ष वेधत होता...


पण आज पुस्तकाने बाजी मारली

नव्या सुवासाने भुरळ पाडली

कसे का असेना गट्टी जमली

रिमोटची सत्ता जणू उलथून टाकली...


काय झालं मला कळलं नाही

माझं लक्ष काही विचलित झालं नाही

पुस्तकाच्या नादाने जीव वेडावला

आणि अभ्यासाचा खरा शुभारंभ झाला


रिमोट शेजारीच पडला होता

अपमान सहन करीत रडत होता

नेहमी एकमेकांचा पाणउतारा करतोस

म्हंटल मनातच

भोग आता तुझ्या कर्माची फळं...


नजर तिरकी होता

उत्ताणा पडलेला मी पाहिला

वाटले मला माझ्या विजयाचा

खरोखरच दिवस उगवला असेल पहिला..!


Rate this content
Log in