STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

रिमझिमतं मन

रिमझिमतं मन

1 min
246

पावसाच्या सरी

करी ओलचिंब तन

रिमझिमतं मन

श्रावणसरीनं


कुंद हवेसंगे

येई ओला गारवा

प्रेमस्पर्श हवा

साजणाचा


टपटप येती 

कशा सरींवर सरी

मजाचं न्यारी

भिजण्याची


जोर धारांचा

तसाच प्रेमी युगलांचा

ओल्या घट्ट मिठीचा

परमानंद


धारा बरसती

प्रेमिक भान हरपती

धुंदी प्रेमाप्रती

अद्वैतात



साहित्याला गुण द्या
लॉग इन