रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस
1 min
142
रूप आगळे पर्जन्याचे,
कधी बनती या श्रावणधारा,
रिमझिम रिमझिम नाद अनाहत,
फुलवीत जाई मन पिसारा. .१.
चैतन्याने भरते सृष्टी,
हिरवाईने नटते धरती,
दवबिंदू त्या पर्णावरती,
रूप साजरे, खुलुनी दिसती. .२.
नभी दाटता झाकोळ ढगांचा,
बरसून येती जलधारा,
टप टप टप टप थेंब वाजती,
साठवित हा धुंद नजारा. .३.
मनतरंग प्रेमीजनांचे,
बळी राजांच्या सत्यातले,
बीज रुजवूनी अंकुर येई,
क्षण साजरे आनंदाचे. .४.
