रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस

1 min

79
पाऊस रिमझिम आला.
हिरवा बहर पसरला.
दवबिंदूतुन तो सूर्य चमकला.
अंकुर कोवळे लहरू आले,
बहरू लागले शिवार हे सारे.
आकाशात निळ्या ते काळे ढग,
धुक्यानी डोंगरास दिली ऊब.
हा खुला आसमंत क्षितिजा पर्यंत.
तो हिरवागार ऋतुराज श्रीमंत.