रिकामटेकडा
रिकामटेकडा
1 min
604
अलीकडे जाणवतंय मला
खूप रिकामटेकडा आहे मी
मी सोडून बाकी सगळे कामात
मीच फक्त एकटेपणाच्या कोमात
ऑफिस बिझी, घरकामात बिझी
कॉलेज-शाळेमध्ये बिझी
पिक्चर पाहण्यात बिझी
ऑनलाइन बिझी
बिझी, बिझी अँड बिझी...
खरेच कित्ती बिझी आहेत ना सगळे?
आपणहून कुणी बोलेल?
हे आता मुळीच नाही इझी...
माझ्यासमोरच आहे एक टेकडी
बिनवर्दळीची, रिकामी टेकडी
जाऊन बसायला एकदम इझी
देईन आवाज तुम्हाला
या हो तुम्ही पण इकडे
आपण नाही बुवा बिझी...
