रिचार्ज
रिचार्ज
1 min
223
गोल गोल फिरून
ताल सगळ्यांनी धरला
माऊली माऊली
करत टाळ्या काय वाजवल्या...
लहान मुलांसारख्या
दोन पाय उंचावून उड्या काय मारल्या...
पायी चालून निसर्गाचा
आनंद काय लुटला...
का कश्यासाठी
एवढी पायपीट करता...
माऊली माऊली करत
रस्ता का अडवता...
काय म्हणून का पुसता
प्रमोशन पाहिजे असल्यास बॉससमोर झुकता...
स्वतःला 'रिचार्ज' करायला तुम्ही परदेशवारी करता
अन् आम्ही करतो पंढरीवारी तर का म्हणून पुसता...
