STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

रहा सावध !

रहा सावध !

1 min
11.7K

सांगे ओरडून

इथे जो तो 

अस्तित्व स्वतःचे !


कोण जिंकणार

कोण हरणार

नाहीच ईथे

कुणी कुणाचे !


लोभ मोह

क्रोध भारी

हीच खरी हो

दुनियादारी !


दुःख तुमचे

जपा तुम्ही

लावू औषध

वरवर आम्ही !


आणि मिरवू

जनसेवक म्हणून

हीच खरी हो

दुनियादारी !


किती खरे

खोटे किती

देव जाणे

मती ही थिटी


सांभाळा स्वतः

सांभाळा कुटुंब

बहकू नका

रहा सावध सहकुटुंब !


Rate this content
Log in