रेशमी धुके
रेशमी धुके
1 min
184
प्रातःकाल समयी
निघालो फिरावयास
मी अन साजणा
थंडीच्या दिवसात.....
मस्त हिरो होंडावरून
खंडाळ्याच्या घाटातून
रेशमी धुक्याची चादर
अंगाभोवती लपेटून......
चाललो आम्ही तोर्यात
वारा बोलतोय कानात
मस्त रेशमी धुक्यात
जोडी आली रंगात......
सुखाची होतेय बरसात
मी माझ्याच तालात
हसू उमटे ह्रदयात
या रेशीम धुक्यात.......
तहान भूक विसरली
खूप मजा केली
सजणाने साथ दिली
रेशमी या धुक्यात....
