STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

रेशीमधारा

रेशीमधारा

1 min
244

ऋतू पावसाळा आला  

सोबत घेऊन उनाड वारा 

तप्त झालेल्या धरतीला देण्यास रेशीमधारा  


पाऊस पडता बघा

 कसे बदलले रूप 

आसुरलेल्या धरतीचे 

जसे पालटते रूप 

बाल लिलांनी मातेचे  


रिमझिम पावसात दव

भरलेल्या पानांचा तो साज निराळा

सर्वत्र आनंदाला उधाण आले,

झाला चिंब आसमंत सारा  


बळीराजासह सर्वांना सुखावती

बरसणाऱ्या या मृगधारा  

मध्येच लहरे पाऊस वारा रानोमाळी

मृदगंध पसरला बहरून आला निसर्ग सारा  


पानोपानी हिरवळ सजली

 लाजून हसल्या नाजूक वेली

 कुठे गुलाबी, कुठे बदामी 

फुलांफुलांतून खुले इशारा 


लावण्या देखुनी धरतीचे मनातून

उमले स्वप्न सुखाचे, समृद्धीचे 

चैतन्याने सृष्टी न्हाली

ऋतूराजाचा उत्सव हा न्यारा



Rate this content
Log in