रातराणी
रातराणी
1 min
452
शांत गर्द हिरव्या रानात
निरखून पाहतेस तू काजवा
हळूच तुझ्या नजरेस कसा
साद घालतो पाखरांचा थवा।।
रातीचा चमचमणारा काजवा
चमचमणे पूर्ण बंद करतो
तुझ्या नजरेच्या तेजापुढे
त्याचा प्रकाश फिका पडतो।।
अलवार पाखरांचा थवा जसा
तुझ्या ओंजळीत विसावतो
ओंजळीतील तुझ्या दाणे वेचून
उंच नभात गिरकी घेतो।।
