रातराणी
रातराणी
नभी उगवला चंद्रमा रात्र मोहरून आली
धुंद, मस्त गंधात नाजुक, इवलीशी रातराणी हळूच गालात हसली
ना प्रकाश लख्ख ना नजरेचा हिला पहारा
रात्रीत सजला एकट्या रातराणीचा निशब्द हा नजारा
काळोख्या रात्री रातराणीच्या गंधाने आसमंत दरवळला
शृगांर चांदण्यांचा आज नभात पसरला....
नाही हिला बहर जगण्याचा ना दुखवटा सुकण्याचा
एकांती रात्र साथ अन् ही रातराणी शोधते मार्ग जगण्याचा
ना रंगाची उधळण ना सजवणूक सुखाची
अंधाराला कवेत घेऊन रातराणी ही पाठराखण करते जणू दुःखाची
अंधाराला न घाबरता काळोखात ही फुलायचं
शिकावी कला हिच्याकडून जगण्याची..
