रात्र
रात्र
1 min
330
साखर वेडी प्रीत तिची अन्
न्यारीच सगळी रित
कुणालाही अजून न कळले
रात्रीचे गुपीत
एका सांजला किती प्रियकर
मिठीत घेते ती
खुशी वाटते सगळ्यांना पण
मागत नाही फी
काळीकुट्ट रजनी मनोहर
अविट देते मजा
भेदभाव कुठेच नाही
कुणी न तिजला दुजा
शब्दं पारखी फिदा तिच्यावर
त्यास चढवीते नशा
भोर अंधार देऊन जातो
कुणाला नवी दिशा
कुणीही करावे प्रेम तिच्यावर
सदैव मोकळ्या भुजा
अंधार पांघरते स्वतः परंतू
दुजास देते मजा
