STORYMIRROR

Vijay Bhagat

Others

3  

Vijay Bhagat

Others

राष्ट्रसंत

राष्ट्रसंत

1 min
234

उद्धार होईल / माणूस घडेल /

जर वाचतील / ग्रामगीता //


प्रत्येकाने वाचा / ग्रामगीता ग्रंथ /

सर्व धर्म पंथ / विसरुनी //


सांगे तुकडोजी / वागायचे कसे/

बोलायचे कसे / माणसाने //


ग्रामगीता होय / जीवनाचा मंत्र/

जगण्याचं तंत्र / सत्यवाणी//


कुटुंब सोडले / मार्ग पत्करला /

भजनी रंगला / खंजेरित //


राजेंद्र प्रसाद / गुरुकुंजा आले /

गौरवूनी बोले / राष्ट्रसंत //


सर्वांचा सन्मान / सर्वांचा आदर /

खुले हे मंदिरं / सर्वांसाठी //


अनुभवातून / अंतर्ज्ञानातून /

सुवर्णाक्षरी ती / ग्रामगीता //


अंधश्रद्धेवर / शब्दांचा प्रहार /

कट्यारीची धार / वाटे जणू //


Rate this content
Log in