STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

रानवाटा

रानवाटा

1 min
264

रानसखा.....

मुक्त विहरिसी आकाशी

स्वच्छंदी राहती या जगती

उंच भरारी घेवूनी वसुधेवरी

बंधनमुक्त सैर तू करती....

हे रानसख्या रे रानपाखरा

माझा दोस्त बनशील का?

तुझ्यासवे मलाही संचार

गगनी करवशील का?......


इकडून तिकडे वृक्षावरी

फळे चाखिशी तू चोच मारूनी

आंबट चिंबट फळे चाखुनी

पिल्लाला भरविशी पोटभरूनी...

रानसखा दोस्त मला मिळाला

तुझे गुणगान मी गाईन 

तुझ्यासवे गगनी विहरीन

खुशाल मुक्त आनंद मी घेईन.....


Rate this content
Log in