रानवारा
रानवारा
1 min
147
आल्या रिमझिम पाऊसधारा
सुटलाय मस्त भन्नाट रानवारा....,
नभ उतरू आलयं या धरतीवर
जलधारांचे नृत्य या सृष्टीवर......,
देखणा नजारा पाहावयास गेलो
निसर्गातच तासनतास आम्ही रमलो...
नवी पालवी नवी नवलाई गर्द वृक्षांची
भुवरी झुलण्याची घाई नाजूक वेलींची..
जलधारांनी तळे तुडुंब छान भरले
सृष्टीचे रूप अंतरात खोल रूजवले..
घरी येणार मावशीबाई हेच विसरले
मग त्यांनी आम्हा सर्वांना फोन लावले....
हेलपाटे घालून ती फारच दमली
मी मात्र सृष्टीचे रूप पाहण्यात रमली..
मयूरपंखी धरेला मनी कोंदणात ठेवले
लाडक्या सृष्टीला पावसाने चिंब भिजवले....
