STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

रानफुले

रानफुले

1 min
501

रानफुलांचा त्या मस्त सुगन्ध

मन होई धुंद होई बेबंद

 वाऱ्यानी पाने कशी शाहरती

 फुलावरती पाखरे मस्त झोम्बती

मध पिण्याचा त्यांना लागला छंद

  अनवट स्वाद तो रान फुलांचा

 गर्भ रेशमी ऋतू जर्द श्रावणाचा

लागला लळा पाखरू स्वच्छन्द

 रोजचे ते येणे रोज भेटणे 

सूर मालकंस होई तराणे

 बिथरले अंग होई बेधुंद 

रानफुलांचा त्या मस्त सुगन्ध

होई मन धुंद होई बेबंद


साहित्याला गुण द्या
लॉग इन