रानमेवा
रानमेवा
रानातला रानमेवा
खाया लई गोड वाटे
तोडताना रुततातं
बोरी एरोणीचे काटे. ......//१//
रानातल्या या मेव्याची
चव खाया वाटे न्यारी
शहरात या मेव्याची
मागणीच होते भारी . .......//२//
चारं टेंबरं खिरण्या
एक नंबरचा मेवा
खेड्यातल्या लोकांसाठी
निसर्गाचा हाचं ठेवा.........//३//
नाही पाण्याची गरज
कोणी नाही रखवाली
कर्ता आणि करविता
निसर्गच त्याचा वाली .......//४//
प्राणी पक्षी जगतात
याच रानमेव्यावरं
खेड्यातल्या मजूरांना
मिळे याचा रोजगारं .........//५//
मिळे तीनही ऋतुतं
रानमेवा हा रानचा
जगविता तोच धनी
सारा खेळ निसर्गाचा .....//६//
