रांगोळी
रांगोळी
प्रभात होताच उजाडतात
दिशा दाही
सडा सारवण दारी
ठिपक्या ठिपक्याने जोडल्या जातात रांगोळीत
अंगणी रेषा काही
सुबक, सुंदर, रंगारंगानी सजते रांगोळीने मग अंगण
सण, उत्सव, असो लग्न समारंभ
रांगोळीने होते शुभारंभ होते सुशोभिकरण
विविध रंगाचा चालतो
रांगोळीत खेळ
अतिथि स्वागतास सदैव
सज्ज असते
सुरेख, शोभिवंत
अंगणात बसे मेळ
प्राचीन कलेला रांगोळीच्या
मिळाली आहे आधुनिकतेची साथ
उंबरठ्यावरची रांगोळी गेली आहे आता सातासमुद्रापार
संस्कार भारतीने ही रंगाचा मांडला वेगळाच थाट
पाने फुले काढून मांडला जातो पाहुण्यांपुढे पाट
रांगोळीची विविध कलाकृती मांडते आहे
आज जिवंत जीवनाचा सार
रंग रांगोळीचे हे तरंग अंतरीचे
पसरलेत भूवरी सप्तरंगी प्रतिबिंब जणू जगण्याचे
हलके, गडद सारेच ते अनुभवांचे
सुबक चौकोनी सारे त्या सजवते
भविष्यातले स्वप्न पाहण्या आशेचे
