STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

रानगंध

रानगंध

1 min
2.1K


आलं आभाळ भरुन

होई मना मधी खुशी

रान पेराया निघाली

स्वप्न बाधून उराशी ।।


येता मिरगाची सर

दरवळे रानगंध

खूणवितो रान वारा

झुळू झुळू वाहे मंद ।।


मेघ राजा बरसला

माय भूमी सुखावली

पसरला रानगंध

शालू हिरवा नेसली ।।


रान हिरवं हिरवं

फुलू लागला रे मळा

येई धावून पाखरं

नित्य भरुलागे शाळा ।।


रान शिवार फुललं

पक्षी गाऊ लागे गाणी

कानी येता कुज बूज

मन येतं रे भरुनी ।।




साहित्याला गुण द्या
लॉग इन