STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

रामनवमी

रामनवमी

1 min
210

चैत्र महिन्याचे झाले आगमन

सृष्टीला नवरूप प्राप्त जाहले

पहिला दिन चैत्राचा या दिवशी

घरातून संकल्पगुढीत मानव रमले....


चैत्राच्या तिसर्‍या दिनी प्रत्येकाने

घराघरातून चैत्रागौरचे पूजन केले

रामनवमी पर्यंत कुटुंबातून मग

गौरीची पूजा केली,घरसारे आनंदले...


नऊदिनी नऊ पदार्थ,नऊ फळे

देवीला नैवैद्यरूपी अर्पण केले

केरीडळ अन केरीचे पन्हे चाटवले

चैत्रांगणाने घराचे दार रांगोळीने सजवले....


चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला

विष्णूचा सातवा अवतार आला

श्री प्रभूरामचंद्रांचा जन्म जाहला

आजचा दिन रामनवमी म्हणून साजरा झाला....


माध्यान्हाच्या वेळी दुपारी बाराला

रामजन्माचा सोहळा साजरा करतात

साखरयुक्त गाठीपण अर्पण करतात

सुवासिक फुले मनापासून वाहतात.....


रामाचे पूजन, आरती पण करतात

गीतरामायणा सारखे कार्यक्रम होतात

रामजन्माचा पाळणा हलवून पाळणा म्हणतात

रामजन्मोत्सव धूमधडाक्यात साजरी करतात...


Rate this content
Log in