STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

राम राम घ्या

राम राम घ्या

1 min
209

अयोध्येचे रामचंद्र,जन मानसी धाम

जोडूनी दो कर कमले,घ्यावा राम राम।।धृ।।

चैत्र माह शुक्ल पक्षी,यज्ञ फळा आले

अग्निदेव प्रसादी,कौशल्या बाळ झाले।

अयोध्या ल्ई आनंदी, ठेविले नाम राम।।१।।

एक वचनी तू देवा, आर्दशाचा ठेवा

गादीस कैकयी हेवा,मंथरेचा कावा ।

लक्ष्मुन सीता संग देवा,वनवासी धाम।।२।।

मातृभक्ती पितृभक्ती,रामराज्य सेवा

बंधु प्रेम, सत्य वचन,राम राज्य मेवा।

सुखी समाधानी देवा,गाळत होता घाम।।३।।

राम लक्ष्मण सीता, हनुमान भक्ती

भारत लंका रामसेतू,सीतामाई मुक्ती ।

रावणाचा होई अन्त,बोला सीता राम।।४।।

अभिवादनी जनता, करी राम राम

गाठी भेटी येता जाता,होई राम राम ।

राम प्रहरी नारायणा,घ्यावा राम राम।।५।।


Rate this content
Log in