राखी पोर्णिमा
राखी पोर्णिमा
1 min
163
आला सण पोर्णिमेचा
भाऊ बहिण नात्याचा !!
रक्षा करी भाऊराया
धागा असा मांगल्याचा!!
बहिणीची माया प्रेम
राखी बांधते निखळ !!
भाऊ माझा सुखी राहो
अशी प्रार्थना प्रेमळ !!
माया प्रेम बहिणीची
कधी आईसमान !!
हट्ट ही बहिण धरी
छोट्या मुलीसमान!!
भेटवस्तू हवी तिला
राखी बांधते भावास !!
खुश होऊन नाचते
सुखी भाऊ इच्छा खास!!
अशी जोडी निसर्गाने
भाऊ बहिण प्रेमाने!!
नाते अतुट जुळले
वृद्धिंगत विश्वासाने!!
