राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज
राजर्षींचा जन्म जहागीरदार घरचा
कौतुके सुमने सारीकडे उधळली गेली
चौथा शिवाजी राजा अचानक गेल्यावर
छोटा शाहूवर दत्तक राज्याची जबाबदारी आली....
सर्व अधिकार झाले मग प्राप्त
थोर"समाजसेवक" त्यांची ख्याती
अस्पृश्यता,जातीभेद निवारण करूनी
कर्तृत्वात राजर्षी शाहू मनसोक्त नहाती...
शिक्षण दिले खेड्यापाड्यातील मुलांना
त्यांच्यासाठी वसतीगृहेही उभारली
अनेक गावागावातून त्यांच्या प्रेरणेने
अनेक पिढ्यातील मुले शिकून तयार झाली,...
शाहूमहाराजांनी कलांचा आदर केला
कलावंतांना राजाश्रय मिळवून दिला
कार्याचा गौरव म्हणेन शाहूमहाराजांना
"राजर्षी" पदवीने सत्कार थोरांनी केला,....
