राजकारण
राजकारण
1 min
373
थोडे से बदल बाकी सगळ सवयी प्रमाणे चालू आहे,
सगळेच चांगले बोलतात वागतात मग वळू कोण आहे.
सगळ्या जनतेला चांगल्या राज्याचे गळू आहे,
राजे जन्मावे दुसऱ्या घरात मग पळू कोण आहे.
मुखवटे झाले खूप फसवे आणी फसनारे खूप आहे,
तरी आम्ही स्वताला विकतो त्यांच्या कडे पैसा खूप आहे.
नंतर आम्ही वरडतो त्यांच्या नावाने आमच्याकडे सूर आहे,
त्यांच काम झाल ते पळून जातात त्यांच्याकडे धूर आहे.
सगळेच सारखे नसतात काहींना देश हवा आहे,
नव्या राजकारणाचा हाच चेहरा नवा आहे.
