Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

राजकारण

राजकारण

1 min
11.1K


राजकारणात लोकांना सांगतात, थांबवतो आता भ्रष्टाचार ।

टेबलाखाली देणं घेणं करुन दर्शवितात आपला शिष्टाचार ॥

आपल्या कडून होईल तेवढे, चांगलं काम करायचे असते । 

नंतर सागंतात राजकारणात प्रत्येक गोष्ट करायची नसते ।।


राजकारणात नाती , मित्र उपयोगात आणलेली शिडी असते । 

एकदा वर पोहचलं कि पुन्हा त्यांची गरज नसते ॥ 

चागले विचार चांगला हेतु , इथल्या जगाला मानवत नसते ।

ईतराना होणारे त्रास यांच्या कठोर मनाला जानवत नसते ॥ 


इथे काय कमावलं, काय गमावलं याचं भाकित नसते । 

काहिही केल तरी याच सर्व गणितच निराळ असते ॥ 

राजकारणात कुणी भाऊ , बहिण , काका , मामा नसतो ।

इथे एकटयानेच जगतात कोणी जिवाभावाचा नसतो ।।


राजकारणात कोणत्याही भावनाना जागा नसते । 

याला दगडासारख मन हवं शिक्षणाची गरज नसते ।। 

विरोधात बोलणाऱ्यांचे आवाज इथे दाबला जातो । 

जास्तीचा बोलला तर एक्सीडेंट मध्ये मारला जातो ॥ 


इथं भ्रष्टाचाराला वाव असतो , खेळण्यासाठी डाय असतो ।

सत्ताधारी आणि विरोधी मिळून आपसात खेळत असतो ॥ 

जनतेला आपसात लढवून राजकारणी टाळी वाजवीत असतो । 

लोकांच्या त्रासाची मजा घेऊन तो दुरुनच पाहत असतो ।|


 राजकारणात आपलं परकं कोणीच नसते | 

अपक्ष लढणे नंतर एकत्र होणे सहज असते ॥ 

अन्यायाधी सत्ता इथे , सत्याला काही थारा नसते । 

पोटात एक नि बाहेर एक हे स्पष्ट दिसत असते ॥ 


राजकारणाच्या भांडणात सामान्य माणसाचं मरणं असते । 

पांढरी शुभ्र वस्त्र घालून , मन मात्र काळवंडलेले असते ॥ 

तावडीत नेहमी त्याच्या सामान्य जनता व शेतकरी असते । 

आपली तिजोरी भरण्यासाठी निर्लज्जपणाची हातोटी असते ।


Rate this content
Log in