राजे
राजे

1 min

13.2K
पुरंदरी जन्मले,
सई बाई पोटी बाळ,
शिवबांचा छावा,
संभाजी लडिवाळ.
🚩🚩🚩🚩🚩🚩
आईस मुकले पोर,
धाराऊ करी माया,
जिजाऊंचा लाडका,
संभाजी राया.
🚩🚩🚩🚩🚩🚩
अनेक भाषा अवगत त्यांस,
बुधभूषण त्यांनी लिहिला खास,
अफाट बुद्धी सामर्थ्यास,
ताकदीची त्याला साथ.
🚩🚩🚩🚩🚩🚩
भोगल्या कितीक मरण यातना,
नाही गेले तरी शरण शत्रूला,
मुघलही जुल्म करून हरला,
तरी माझा राजा नाही रडला.
🚩🚩🚩🚩🚩🚩
त्रिवार वंदन माझ्या राजाला,
अभिमान आहे मराठी मातीला,
शिवरायांचे नाव राखिले,
छत्रपती संभाजी राजा.
🚩🚩🚩🚩🚩🚩