राजे...
राजे...
आईच्या गर्भात राजे सज्ज झाले ,
जीजाऊ उदरी बघा स्वराज्य स्थापक आले ...
प्रजेसाठी झटले प्राण पणाला लावून ,
पाहून पताका मराठीची शत्रूही शरण आले ...
रुबाबदार राजे माझे मन जिंकून गेले ,
घराघरांत बोले मनात छत्रपती शिवाजी आले ...
झेंडा मराठी बाणा मराठी मराठी मायबोली ,
मराठीच्या उद्धारासाठीच राजे शिवाजी आले...
मृत्यु राजांचा होता शत्रूचे मनही हळहळले ,
शिवा जिंकून गेला जग शत्रूही ओवाळाला आले ...
युगंधर पुरुष हे युगांयुगे अमर जाहले ,
पृथ्वीवरचे चमत्कार हे पिढ्यांपिढीला मार्ग आले ...
