STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

राजे तुम्ही परत या

राजे तुम्ही परत या

1 min
461

राजे तुम्ही आजच्या

राज्यात येऊन पाहा...

चार दिवस इथं राहून पाहा...


ज्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी 

तुम्ही जन्मभर पाणी केले रक्ताचे

आज तिथेच असुरक्षित आहे 

जीवन मंदिराच्या गाभाऱ्यात

उभा राहणाऱ्या भक्ताचे...


राजे, काय सांगू कशी हो

केविलवाणी ही अवस्था झाली...

किती लाचार ही सरकार

नि न्यायव्यवस्था झाली...


इथं शिक्षणाच्या पदव्या

काही पैशात मिळतात...

न्यायनिवाडा न होता कित्येक 

बेवारस मृतदेह कुठेतरी जळतात...


शेतकरी होतोय दिवसेंदिवस भिकारी...

गरिबांचे रक्तपिपासू बनलेया काही शिकारी...


या राज्यात "सर्व भारतीय भाऊ-बहिण" 

हे राष्ट्रगान शाळेत दररोज म्हटले जाते...

नि स्त्रियांची इज्जत भररस्त्यावर लुटली जाते...


राजे तुम्ही या परत हाती घ्या प्रशासन...

तुम्हीच गुन्हेगारांना करु शकता कडक शासन...


Rate this content
Log in