राजे शिवछत्रपती
राजे शिवछत्रपती
आमुचा राजा छत्रपती,
आम्ही मावळे मराठी,
सह्याद्रीच्या शिखरावरती,
राजा बोले मराठी
शिवराय राजा आमुचा,
आम्ही मावळे मराठी,
शिवरायाची भूमी ही,
कड्या-कपारी सह्याद्री
असा राजा, अशी धरती,
हिरवी शेते, नद्या वाहती,
कृष्णा कोयना, गोदावरी माई,
महाराष्ट्र माझा, राजा छत्रपती
ढाल तलवारी वीर येथे,
मावळे मराठी, प्राण देऊन
कोंढाणा घेऊ राज्य राखतो,
मावळा तानाजी
असा राजा झाला नाही,
सह्याद्रीच्या शिखरावरती,
निशान फडकते, हे राज्य मराठी,
घोडा धावतो, चमकते तलवार,
राजा आमुचा छत्रपती
मायभूमीचे रक्षण करण्या,
सज्ज झाला शिवनेरी,
हर हर महादेव, घोषणा झाली,
जिजाई वीरमाता,
राजे आमुचे शिवछत्रपती
