STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

राजे मनामनातले

राजे मनामनातले

1 min
173


राजे मनमनातले जागृत आहे अजूनही

ते आमच्यावर विचार रूपाने राज्य करतात ,

अवलंबून तुमची विचारसरणी महाराज

सदमार्गाची युवक कास धरतात !


जेव्हा डगमगले राजे आमुचे

रामदासांनी त्यांना मार्गदर्शन केले ,

पुन्हा नवं उमेदिने उभे राहुनी

मुघलांना स्वराज्यातून पळवून लावले !


न केला कधी महाराजांनी भेदभाव

आणि नाही पहिल्या कधीही जाती ,

मानवता धर्म जपूनी जीवनी

जपले आपले सर्व नाती !


राजे मनामनातले जे आहे आज

ते हवे आहे सत्यात आम्हाला ,

बनवून तुमचे मावळे राजे

लागू तुमच्याबरोबर कामाला !


आमच्या मनातील महाराजांची कीर्ती

चंद्रसूर्य असेपर्यंत राहतील ,

आम्ही करू स्वप्न पूर्ण त्यांचे

आणि छत्रपती स्वराज्य नयनांनी पाहतील !


राजे आमच्या मनातील आमच्या रूपाने

भू मातेवर नक्कीच येतील,

फोपावलेल्या या दहशतवादाला

एक दिवस नक्की मात देतील !



Rate this content
Log in