राजा भिकारी
राजा भिकारी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून, आजीची गोष्ट आठवायची.
राजा भिकारी झाला तरी, विसर पडू नये भिकारी राजाच असण्याची.
राब राब राबतो, स्वप्न सुध्दा एकच पिकवण्याचे पाहतो.
दिलीच हुलकावणी पावसाने, पुन्हा पेरणी करण्या हाच पोशिंदा लढतो.
तो पिकवतो म्हणूनच, आपन जगतो आणि देश चालतो.
उपकाराची परतफेड, अडचणीच्या काळात आपणच त्यांना हीनवतो.
कितीही संकटे आली तरी, हा भूमिपुत्र काही थांबणार नाही.
खचला तो तेव्हा खरा, जेव्हा सावकाराच कर्ज सारा परिवार खायी.
सगळा परिवार मारण्यापरीस, मी एकटा मेलेला बरा.
आत्महत्या तू केलीस, कुटुंबाचा झाला सातबारा कोरा.
पेरायला वाली आण , घर चालवायला नाही आता आणा.
शेतकरी दिनाच्या शुभेच्या देणारे, तूझ्याच तिरडीवर झालेत बघ गोळा.
