राहू दे मज कायम छोटा
राहू दे मज कायम छोटा
1 min
283
निरागसता ही असते कायम
अन बाकीची मौज मजा
रम्य असे ते बालपण अन,
मोठेपण ही आहे सजा
क्षणात आसू क्षणात हासू
निर्मळ खळखळ हास्य झरा,
क्षणात कट्टी क्षणात बट्टी
मैत्रीचा हा मंत्र खरा
दांभिकतेचे नाही मुखवटे
नाही वागणे खोटे खोटे,
मनी एकआणि दुसरे ओठी
कपट कधी ना असते पोटी
मौज मजा ती करता येईल
मना सारखे जगता येईल,
नको मुखवटा खोटा खोटा
राहू दे मज कायम छोटा
