राहुन गेलय...
राहुन गेलय...
1 min
174
त्यांचं खूप वेळ हातात हात घेऊन
निवांत बसायचे आणि
एकेका काॅफीच्या घोटासोबत
एकमेकांना ङोळयात साठवायचे
राहुन गेलय..
त्यांचं तिला आवङणारी
पैठणी आणुन फोटो काढायचे
त्यांच्या साठी एक छानशी
आरामखुर्ची आणायची
राहुन गेलय ..
त्यांच पै पै साठवुन
स्वप्नातल घर बांधायच
पोरांसाठी झोपाळा लावायचा
मागच्या अंगणात
आंब्याचे झाड पेरायचे
राहूनच गेलं...
त्याचं स्वताची काळजी घ्यायच
जगण्यासाठी श्वास हवा
आणि श्वासाला तुम्ही....
हे जाणून घ्यायचे
