STORYMIRROR

Meera Bahadure

Others

2  

Meera Bahadure

Others

रागावलास का पाऊस राजा

रागावलास का पाऊस राजा

1 min
29

रागवलास का पाऊस राजा

 तुझ्याविना जगणं ही सजा 

कधी डोळ्यात पाणी तर कधी हासू 

जागावलास‌ का माणसातला माणुसकीचा दर्जा 

कधी देतोस मजा कधी भली मोठी सजा 

रागावलास का पाऊस राजा


 तुझ्या विना माणसाची काडी किंमत नाही 

तुझ्या अथांग तांडवा पुढे काहीच चालत नाही 

चुकले आमचे राजा केला नाही तुझा विचार 

निसर्गाचा कधीच समजलं नाही वापर

 तुझ्याविना आमची तहान भूक भागत नाही

माहीत असून तुला तू तसा वागत नाही

 माणसाने भोगला त्याच्या कर्माचा नतीजा

रागावलास का पाऊस राजा


 अनेक कुटुंब पुरामध्ये वाहून गेली

 तू मित्र की शत्रू ही द्विधा झाली

 कसा वाचवू मरणार्‍या जीवाला

 तुला थांबवायची युक्ति मिळेना कुणाला

दया येऊ दे राजा तांडव थांबव ना

 मीरा बाई विनंती करीत

 पाऊस राजा नको देवू एवढी मोठी सजा

 रागावलास का पाऊस राजा


Rate this content
Log in